पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन

दरवर्षीप्रमाणे आदरणीय श्री राजेंद्रजी कपोते साहेबांच्या मार्गदर्शनानुसार अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेशविसर्जन मिरवणुकीत आपल्या पोलीस मित्र संघटनेतर्फे पोलिसांना आपले पोलिस मित्र संघटनेचे ६५ कार्यकर्ते सातव्या दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन घाटावर पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, निगडी प्राधिकरण येथेकाम करत होते . गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी पोलीस खात्याला जास्त कार्यकर्त्यांची गरज चापेकर चौकात असते त्याच्या अनुसार आपल्या पोलीस मित्र संघटनेचे ३५ कार्यकर्ते चापेकर चौकात काम करत होते त्यावेळेस श्री. गजानन चिंचवडे अध्यक्ष पोलीस मित्र संघटना पिंपरीचिंचवड शहर, श्री. गोपाळ बिरारी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र , मी आचार्य योगेश ना.संपर्क प्रमुख पोलीस मित्र संघटना पिंपरीचिंचवड शहर , श्री अतुल राऊत उपअध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी आणि उत्साही कार्यकर्ते रात्री १.३० वाजेपर्यंत होते . त्यापैकी ज्या मुली महिला होत्या त्यांना १२ वाजता मिरवणूक संपल्यावर घरी सोडण्याची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले. पोलीस उप आयुक्त श्री. गणेश शिंदे साहेब , सहाय्यक पोलीस उपआयुक्त श्री.राम मांडुरके साहेब आणि श्री. विठ्ठल कुबडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपल्या पोलीस मित्र संघटनेचे आभार मानले व पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला अशीच पोलिसांना मदतीचा हात देत राहण्याची सूचना केली .

latest Blog

सामाजिक शांततेबद्दल पोलिसांचा सन्मान
Read More

दिनदर्शिकेचा वितरण सोहळासमारंभ
Read More

पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन
Read More

पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य
Read More